
अमळनेर:- येथील एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कुलची विद्यार्थिनी प्रगती रविंद्र पाटील हिने स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कोणताही क्लास न लावता स्कॉलरशिप परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. प्रगती ही रंजाणे गावाचे पोलीस पाटील व प्रगतिशिल शेतकरी रविंद्र प्रकाश पाटील यांची मुलगी असून तिचे व पालकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

