अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील रहिवासी कमलेश अशोक सूर्यवंशी व पंकज अशोक सूर्यवंशी व प्रमोद मधुकर पाटील यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वितरित केले.
गावातील प्राथमिक शाळेच्या १ ते ४ वर्गातील १६६ विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मिक पवार यांनी तीनही दात्यांचे स्वागत केले. तर ग्राम विकास शिक्षण संस्थेतील शिक्षक प्रमोद मधुकर पाटील यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ डिजिटल शिक्षण मिळावे म्हणून मुव्हेबल प्रोजेक्टर विथ स्पीकर देण्यात आले. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गात अतिशय छान पद्धतीने प्रोजेक्टर नेऊन ऑनलाइन शिक्षण येता येऊ शकेल. यावेळी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तुषार सैंदाणे, महेंद्र पाटील, विलास सूर्यवंशी, निलेश शिंदे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक गोकुळ पाटील, सतीश शिंपी, आर. के. पाटील, रमेश पिंगळे, स्वाती कदम, कविता पाटील, राज्ञी लांडगे आदी शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होते.