अमळनेर:- एज्युकेट अकॅडमी आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024 नवीन शैक्षणिक धोरणानुसार एफ एल एन ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, अपेक्षित अध्ययन कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी प्राप्त होण्यासाठी, या दृष्टिकोनातून या परीक्षेचं राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा म्हणून आयोजन केले जाते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
या परीक्षेत चि. कार्तिक निलेश पाटील इयत्ता सातवी सेंट मेरी हायस्कूल मंगरूळ अमळनेर या विद्यार्थ्याने विशेष प्राविण्यासह राज्यस्तरीय गुणवत्ता क्रम 22 वा , जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकाने व अमळनेर केंद्रातून प्रथम क्रमांकाने येण्याचा बहुमान पटकावला . या यशाबद्दल राज्यस्तरीय पारितोषिक समारंभात माजी शिक्षण आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याला निलेश पाटील उपशिक्षक जि प शाळा जानफळ ता.एरंडोल यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल सेंट मेरी हायस्कूल मंगरूळ अमळनेर येथील प्राचार्य ,शिक्षकवर्ग, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.