
अमळनेर:- येथील भारत गॅस ऑफिस तर्फे मारवड येथील विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांना घरगुती गॅस जोडणी कशी करावी व स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भारत गॅस ऑफिसचे मॅनेजर चंद्रकांत देसले, राजेंद्र कोतकर व दिनेश बोरसे यांनी सु.ही. मुंदडे हायस्कूल व न्हा. म.तू. पाटील कला महाविद्यालयात गॅस जोडणी व घ्यावयाची काळजी, तसेच विविध बाबिंसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सैंदाणे यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य वसंत देसले, मुख्याध्यापक श्री. सैंदाणे, पत्रकार डॉ. विलास पाटील, राजेंद्र साळुंखे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. संजय बागुल यांनी आभार मानले.




