
अमळनेर:- येथील शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान कमिटी व शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने विशाळगड येथे घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ मोर्चा काढून उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गावात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली विशाळगड किल्ला आणि आसपासच्या गावात हिंसाचार करण्यात आला, त्यात विशाळगड दर्गा आणि मशिदीची तोडफोड करण्यात आली आणि स्थानिक मुस्लिमांवर हल्ले करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. विशालगड हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात यावे आणि हिंसाचारात सामील असलेल्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी सदरील विषयांवर तात्काळ निर्णय घेऊन वरील विषय प्रमाणे आमची मागणी मंजूर करण्यात यावी ही याच वेळी ए आय एम आय च्या वतीने ही सदर घटने बाबात लेखी निवेदन दिले गेले इदगाह मुस्लिम कब्रस्तान कमिटी व हिंदू मुस्लिम समाजाचे विविध नेते उपस्थित होते याप्रसंगी हाजी नसीरुद्दीन शेख, तिलोत्तमा पाटील,डॉ अनिल शिंदे, अझहर अली सैय्यद,संदिप घोरपडे, प्रा.अशोक पवाऱ, सर,रियाज मौलाना,के डी पाटील, गोकुळ बोरसे,बी के सुर्यवंशी, अँड रज्जाक शेख,मनोज पाटील,गुलाब नबी पठाण,नविद शेख, इम्रान खाटीक,हाजी सईद शेख, आरीफ भाया ,अल्तमश शेख, जुबेर पठाण ,सह आदि बांधव उपस्थित होते




