अमळनेर(प्रतिनिधी): येथील विश्व मानव रूहानी केंद्राच्या शाखेत गुरुपौर्णमा उत्साहात साजरा.यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती होती. सेवा भावच मानव जीवनाचा मुळस्वभाव असून केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मंत्री अनिल पाटील यांनी कौतुक केले. केंद्रातर्फे वर्षभर रक्तदान,वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम यासारखे सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यावेळी स्थानिक कमेटीचे प्रबंधक योगेश कुमावत, जिल्हा समन्वयक राजेश सोनार , जेष्ठ प्रचारक आनंदा पाटील, रविंद्र बोरसे, गयबु पाटील, गिरीधर पाटील, समाधान पाटील तळवाडे, नानाभाऊ कुंभार, संजय कासार,विजूनाना पाटील ,चेतन वानखेडे मांडळ, दिपक सोनार, प्रवीण पेंटर, अविनाश कुमावत, सदाशिव सैंदाने, मुकेशभाऊ , बिरजू पेंटर,वाल्हे दादा, मराठे दादा तसेच अमळनेर, चोपडा व पारोळा तालुक्यातील २००० पेक्षा जास्त सत्संगी बंधु व भगीनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला .