
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील निसर्डी येथील मयूर सोनवणे(वय-२४) याचा अपघात होऊन उपचारादरम्यान मुंबई येथील रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. निसर्डी (ता.अमळनेर) येथील मयूर बापू सोनवणे हा अमळनेर शहरात चहाचे दुकान चालवत होता.२६ रोजी रात्री दुकान बंद करून शहरातील यात्रा पाहून तो रात्री १२ वाजेनंतर मोटारसायकल ने नीसर्डी निघून गेला.काही वेळाने त्याचे गावातील मित्र किरण पाटील व धीरज पाटील हे देखील यात्रा पाहून निसर्डी निघाले असता रात्री १२ ते १ च्या दरम्यान मयूर हा लोंढवे ते निसर्डी दरम्यान बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला,दोघांनी मयूर का अमळनेर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले,तेथे शुध्दीवर आल्यावर त्याने सांगितले की मी स्वतः गाडीवरून पडून अपघात झाला आहे.प्रकृती गंभीर बनत चालल्याने पुढील शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे हलविण्यात आले.मात्र उपचार सुरू असतांनाच २५ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.अमळनेर पोलीस स्टेशन ला अपघाती मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.




