
अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील झामी चौक भागात राहणारा राधे लखन जाधव हा मागील २-३ दिवसांपासून २ अल्पवयीन मुलीच्या मागे फिरून त्यांना वाईट नजरेने हातवारे करत असल्याची घटना उघडकीस आली असून त्याच्याविरोधात अमळनेर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधे जाधव याला पीडित अल्पवयीन तरुणीच्या काकाने हटकले असता त्याला देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.फिर्यादी अल्पवयीन मुलींच्या शाळा,कॉलेज तसेच शिकवणी वर्गाच्या बाहेर जाऊन त्यांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय भगवान शिरसाठ करत आहेत.




