अमळनेर – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. खासदार स्मिताताई वाघ यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. नवी दिल्ली येथे सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने महाराष्ट्र सदनात हा अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक, लेखक आणि कादंबरीकार होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव वालुबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव होते. त्यांनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य आणि 19 पोवाडे रचले आहेत. पोवाडे आणि लावणी या रचनांमुळे त्यांना साहित्यविश्वात ‘शाहीर’ म्हणूनही ओळखले जाते.