अमळनेर:- तालुक्यातील पिंगळवाडे येथील मनोज सपकाळे हा तरुण मुंबई येथील पोलीस खात्यात नुकताच भरती झाला. यासाठी त्याने प्रचंड परिश्रम घेतले. घरची परिस्थिती बेताची असल्याने आपण काहीतरी केलेच पाहिजे अशी इच्छा मनाशी घेऊन हा तरुण मेहनत करत होता. त्याचे आई वडील काबाड कष्ट, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. मनोजचे वडील राकेश निंबा सपकाळे निंभोरा गावात व परिसरात मिळेल ते काम करतात. अगदी सार्वजनिक शौचालय असो किंवा गावातील गटारी साफ करणे असो अशा अनेक प्रकारची काम राकेश सपकाळे आजही करतात. मनोजला सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद निंभोरा ग्रामस्थांना सुद्धा आहे. म्हणून कालच ग्रामपंचायतीच्या वतीने ज्येष्ठ सदस्य चंद्रकलाताई पाटील यांनी मनोज सह त्याच्या मातापित्यांचा सत्कार केला. मनोजला पेढा भरवून उपस्थित सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. या प्रसंगी सर्व सहकारी पदाधिकारी, उपकेंद्राचे प्रमुख डॉ.अक्षय व त्यांचे सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Related Stories
December 22, 2024