
शेतकरी कुटुंबात तरळले आनंदाश्रू
अमळनेर-तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी पुत्र असलेला दीपक देविदास पाटील पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने शेतकरी कुटुंबात आनंदाश्रू तरळले आहेत.
एमपीएससी परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात 56 वी रँक त्याने प्राप्त करीत हे यश मिळविले आहेत.दीपक हा देविदास दशरथ पाटील यांचा सुपुत्र असून शेतीवर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.दीपक हा लहानपणीपासूनच गुणवंत असल्याने कुटुंबाने त्यास शिक्षणासाठी मोकळीक दिली होती,आधी इंजिनिअरिंगचे बी ई चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती,आधीपासूनच पोलीस दलात जाण्याची इच्छा असल्याने या मार्गाकडे तो वळला आणि अहोरात्र अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा अखेर तो उत्तीर्ण झाल्याने कुटुंबानेच नव्हे तर संपूर्ण गावाने आनंद व्यक्त केला आहे.शेतकरी दिनकर पाटील यांचा तो पुतण्या असून या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.




