विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न…
अमळनेर : येथिल खा.शि.मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),या ठिकाणी विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन समारंभ निमित्ताने अध्यक्षस्थानी मा.ना.अनिल पाटील होते तर प्रमुख उदघाटक म्हणून मा.ना चंद्रकांत पाटील,प्रमुख अतिथी म्हणून मा.राजेश पांडे, मा.दिलीप रामू पाटील,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,माजी आमदार शिरीष चौधरी,भैरवी वाघ-पलांडे आदी उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या शुभ -हस्ते सरस्वती देवी,पूज्य साने गुरुजी,दानशूर श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार, माल्यार्पण करण्यात आले.
या वेळी स्वागत गीत राजनंदिनी यादव या विद्यार्थ्यानीने म्हटले. तदनंतर ना.अनिल पाटील यांचा सत्कार खा.शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी यांनी केले तर ना.चंद्रकांत पाटील यांचा सत्कार सीए नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे यांनी केले.या वेळी करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी धनंजय कोळी याची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार ना.चंद्रकांत पाटील, ना.अनिल पाटील,प्राचार्य अरुण जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकेत सीए नीरज अग्रवाल यांनी महाविद्यालयाची एकूण वाटचाल,नविन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, महाविद्यालयाने घेतलेल्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा या संबंधी विस्तृत विवेचन करून काही रास्त मागण्या मंत्री महोदयापुढे मांडण्यात आले.
ना.चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले की,अलिकडे शिक्षणात जे आमूलाग्र बदल होत आहे त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे तसेच अलीकडे कौशल्यधारीत शिक्षणाची गरज आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अशा बदलांना स्वीकार करून पुढे जावे.याचप्रमाणे आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन मला द्या त्या संबंधी सकारात्मक प्रयत्न केले जातील,असे म्हटले.
अध्यक्षीय मनोगतात ना.अनिल पाटील यांनी म्हटले की,अमळनेर भूमी ही त्यागाची,संतांची व पावनभूमी आहे म्हणून या ठिकाणी श्रद्धा जपण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एकत्र येऊ अशी भावनिक साद यावेळी दिली.या वेळी मंचावर खा.शि.मंडळाचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, प्राध्यापक प्रतिनिधी,मुख्याधिकारी प्रतिनिधी,शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रस्तुत समारंभाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.अरुण जैन,डॉ.धिरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,डॉ.विजय तुंटे, प्रा.पराग पाटील,डॉ.कल्पना पाटील,डॉ.व्ही बी मांटे, डॉ.वाय व्ही तोरवणे,डॉ.बालाजी कांबळे,ग्रंथपाल दिपक पाटील,राकेश निळे,देवेंद्र कांबळे,विजय ठाकरे,संदेश शर्मा,जयदेव पाटील,योगेश चौधरी, दिपक चौधरी,कैलास पाटील,पंकज भदाणे,मेहूल ठाकरे आदींनी सहकार्य केले.
सभेचे सूत्र संचालन व आभार डॉ.रमेश माने यांनी केले