हिंदू संघटनांतर्फे तहसीलदारांना निवेदन
अमळनेर:- उरण येथील यशश्री शिंदे आणि धारावी येथील धीरज वैश्य यांच्या हत्याकांडांविरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दि. ६ तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन दिले.
निवेदनानुसार अनेक तरुण-तरुणींची निर्घृणपणे हत्या केली जात आहे. उरण आणि धारावीच्या घटनांमध्ये लव जिहाद आणि हिंदू विरोधी मानसिकतेचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.निवेदनकर्त्यांनी या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, हिंदू समाजात दहशत निर्माण करणाऱ्या घटनांवर लगाम बसवण्यासाठी शासन तात्काळ पावले उचलणार असे आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी डॉ. संजय शहा, सचिन चौधरी, अमर सोनार आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.