अमळनेर:- गंभीर गुन्ह्यांचा गतीने तपास करून आरोपीना अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारीचा जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रोख रक्कम देऊन सन्मान केला. अमळनेर पोलीस स्टेशनच्या तपासणीसाठी पोलीस अधीक्षक अमळनेर येथे आले होते.
महिला अत्याचार अंतर्गत व विविध गंभीर १५ गुन्ह्यांचा गतीने तपास केला. तसेच आरोपीना तात्काळ अटक करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले म्हणून पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे , हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे नितीन मनोरे याना रोख बक्षीस देऊन सन्मान केला. त्याचप्रमाणे हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील , पोलीस नाईक सिद्धांत शिसोदे यांनी गोपनीय अहवाल अद्ययावत ठेवला , दप्तर सुरळीत ठेवल्याबद्दल बक्षीस देऊन सन्मान केला. एमपीडीए प्रस्ताव अचूक व कायदेशीर तयार केला म्हणून अनेक गुन्हेगारांवर योग्य कारवाई झाली म्हणून हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , तसेच क्राईम दप्तर अद्ययावत ठेवल्यामुळे संदीप धनगर , राहुल चव्हाण यांचाही सन्मान केला. निरीक्षण व तपासणी दरम्यान उत्कृष्ट परेड केली तसेच इतर कामगिरी केली म्हणून हेडकॉन्स्टेबल हर्षल पाटील, चंद्रकांत पाटील, शेखर साळुंखे, अमोल पाटील, महिला कॉन्स्टेबल मोनिका पाटील, योगेश सोनवणे यांचाही रोख बक्षीस देऊन सन्मान केला. यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हजर होते.
त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गुन्ह्यांची निर्गती लवकर करा ,सामान्य जनतेला न्याय द्या , खरे खोटे याची पडताळणी करा अशा सूचना दिल्या. पोलीस पाटलांचीही स्वतंत्र बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणूका कायदा व सुव्यवस्था पारदर्शी व सुरळीत , शांततेत पार पाडा असे आवाहन केले.