
अमळनेर:- तालुक्यातील ढेकूसीम येथील एक २४ वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील ढेकूसीम येथील रहिवासी अशोक यशवंत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून त्यांचा चुलत पुतण्या भटु दुयोर्धन पाटील (वय २४ वर्षे) हा त्याची आई आशाबाई दुर्योधन पाटील हिच्यासमवेत राहतो. दि. १० रोजी संध्याकाळी ५ वा. च्या सुमारास फिर्यादिस चुलत पुतण्या भटु पाटील यांच्या घराजवळ आरडाओरड करण्याचा आवाज आल्याने फिर्यादी तेथे गेले असता भटु पाटील हा पलंगावर उलट्या स्थितीत झोपलेला दिसला व त्याने त्याच्या पायाजवळ उलटी केलेली दिसली.भटु पाटील याला खाजगी वाहनात टाकुन ग्रामिण रुग्णालय अमळनेर येथे औषधउपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी भटु दुर्योधन पाटील यास तपासून मयत घोषीत केले आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेलं नसून शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण हाती येईल. सदर बाबतीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहेत.




