अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे, शहापूर,बोहरे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त दंडनायक राजपुत्र वीर एकलव्यची आदिवासी बांधवांनी भव्य मिरवणूक, फलक अनावरण, भंडारा व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.पाडळसरेत सुरुवातीला वीर एकलव्य व भगवान शंकराची प्रतिमापूजन सरपंच रूपाबाई भिल्ल यांनी श्रीफळ वाहून माल्यार्पण केले गावातील शेकडो आदिवासी बांधव तसेच महिला वर्ग एकत्रित येऊन राजपुत्र एकलव्य सेना मित्र मंडळाचे शाखा फलक अनावरण करण्यात आले
जुन्या व नवीन पुनर्वसित गावात राजपुत्र एकलव्य प्रतिमेची सजविलेल्या ट्रॅक्टरवर भव्य मिरवणूक काढण्यात आली , कार्यक्रमास माजी सरपंच रुपाबाई भिल,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूकाध्यक्ष भागवत पाटील, शांतता समितीचे सदस्य वसंतराव पाटील,माजी उपसरपंच रवींद्र पाटील, माजी सरपंच सचिन पाटील,दिलबर भिल,रणछोड पाटीलांची विशेष उपस्थिती होती यावेळी उपस्थित आदिवासी बांधवानी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली तर आधार भिल,तुकाराम भिल,दीपा नाईक,इंदल भिल, चंदा नाईक, संतोष भिल,सदाशिव भिल,बापू भिल,बन्सी भिल,पिंटू भिल,मुकेश भिल,सुनील भिल,सोपान भिल,अरुण भिल,महारु भिल,सुदाम भिल,सुनील भिल आदींनी परिश्रम घेतले.
तर कळमसरे येथे गणपती मंदिर प्रांगणात तालुकाध्यक्ष किशोर मालचे, उपसरपंच जितेंद्र राजपूत, ग्रामपंचायत माजी सदस्य आबा महाजन यांनी प्रतिमापूजन करून माल्यार्पण केले, सजविलेल्या ट्रॅक्टर वरून भव्य मिरवणुकीत घराघरातून पूजन करण्यात आले,मिरवणुकीत आदिवासी युवक व युवतींनी आदिवासी गीतावर नृत्य सादर केले, नंतर महाप्रसाद वाटून भक्तांना दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भिलराजपुत्र एकलव्य सेना अध्यक्ष किशोर मालचे उपाध्यक्ष रवींद्र भिल सचिव विलास भिल सल्लागार आबा भिल, देविदास भिल, अशोक भिल,अनिल भिल,रघुनाथ भिल, गणेश भिल,राहुल भिल,किरण मंगल भिल, राजू भिल,अनिल भिल,श्याम भिल आदींचे सहकार्य लाभले.व बोहरे येथेही आदिवासी दिन साजरा करण्यात आला
यावेळी गावातून ट्रॅक्टर वर मोठ्या जल्लोषात वीर एकलव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व समाज बांधवांनी उत्साहात सहभाग घेतला. यावेळी विर एकलव्य मित्र मंडळाचे रवि मालचे,गणेश भिल,देविदास भिल,फूला भिल, गैदल भिल, बापु भिल, हर्षल सैदाणे, प्रवीण भिल, सोमनाथ भिल, सुकदेव मालचे, मंगल महाराज, विजु महाराज आदींनी परिश्रम घेतले.