
अमळनेर:- तालुक्यातील रणाईचे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
चेअरमन पदी भास्कर उत्तमराव पाटील व व्हा.चेअरमन पदी श्रीमती लताबाई काशिनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. एस .पी. महाजन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर सचिव गुलाब भिवसान गायकवाड, निवृत्त सचिव पितांबर पाटील, क्लर्क मनोज शांताराम पाटील यांचे सहकार्य लाभले.




