
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील ग्रुप ग्रामपंचायत चिमनपुरी पिंपळे खुर्द मध्ये क्रांती दिन व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य लोटन रूपचंद भिल व सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई विजय चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण केले व सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करीत आहे. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, स्वतंत्र ओळख व अस्तित्वाला कुठल्याही धोका निर्माण होणार नाही, आदिवासींचा आत्मसन्मान व अस्मिता टिकवणे असा उद्देश राहिला आहे. त्यामुळे बिरसा मुंडा यांच्या एकाचवेळी सर्व क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या उठावानंतर भारतात ‘जागतिक आदिवासी दिवसा’मुळे आदिवासींमध्ये सर्वांगाने उमेद निर्माण होत आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष बापू चौधरी ,अरुण संभाजी पाटील, कृषी अधिकारी सुभाष पाटील ग्रामसेवक किरण लंकेश ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर रावण पाटील , पुरुषोत्तम चौधरी ,जयवंत पाटील ,गोकुळ पाटील,निबा चौधरी,प्रवीण भिल,पिटु भिल,अंकुश भिल, यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा दिल्या

