
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित संस्थेच्या चेअरमन पदी ललिता विलास सोनवणे व व्हाईस चेअरमन पदी शालिग्राम नथु बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संचालक सुभाष महादू पाटील, शेख फारूक हाजी अ. रज्जाक, श्रीमती सुंदराबाई धोंडू कोळी, देविदास पुना कोळी, रवीन्द्र रावण पाटील, नामदेव पोपट बडगुजर, श्रीमती इंदूबाई यशवंत पाटील, डिगंबर हिमतराव मराठे, सुरेश मंगा महाजन, सुरेश दगा धनगर, सोमनाथ नारायण खैरनार सदस्य हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले, तसेच सत्कार प्रसंगी,सरपंच मिनल कोळी तसेच माजी सरपंच नथु भावराव सोनवणे, विलास ओंकार सोनवणे से.नि.सहकार खाते, हिरालाल लक्ष्मण सोनवणे, वसंत रावण सोनवणे माजी चेअरमन, समाधान भास्कर सोनवणे, डॉ अशोक हिंमतराव पाटील, मनोहर किसन पाटील, शुभांगी सुरेश पाटील, सुरेश पा, विजय नथू पाटील, दिपक बडगुजर तसेच तंटामुक्ती अध्यक्ष राजूदादा धनगर व सुरेश लोटन कोळी, रावसाहेब पंडीत कोळी, सुनील धोंडू कोळी व गणेश शालिग्राम बडगुजर, शेखर यशवंत पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित,चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नथ्थु भाऊसाहेब सोनवणे, वसंत दाजभाऊ सोनवणे व समाधान सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.




