
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथील २० वर्षीय विवाहित महिलेचा पाणी भरताना मोटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दिनांक ८ रोजी सकाळी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वैशाली पृथ्वीराज तिरमले (वय २०) ही महिला घरी पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला बेटावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी धुळे येथे नेण्याचा सल्ला दिल्याने हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत




