
न्यू प्लॉट परिसर हिरवागार करण्याचा संकल्प
अमळनेर-येथील नगरपरिषद आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॉट परिसरामध्ये वृक्षारोपण व ट्री गार्ड वाटपाचा शुभारंभ रविवार रोजी करण्यात आला.

न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले आहे.सदर उपक्रमांतर्गत संपुर्ण न्यू प्लॉट परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असून ज्यांना आपल्या घरासमोर वृक्षारोपण करावयाचे असेल त्यांना जळगाव जनता बँकेतर्फे ट्रीगार्ड व वृक्ष देण्यात येणार आहे.मात्र सदर वृक्षाचे संगोपन तथा जगविण्याची जवाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार असून वृक्ष जगविणाऱ्या मान्यवराना जळगाव जनता बँकेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी दिली. तर जळगांव जनता बँकेचे मॅनेजर महेश गर्गे यांनी जास्तीतजास्त लोकांनी या अभियानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अनेकांनी मागणीही नोंदविली.या अभियानात पहिले वृक्ष जगविण्याची जवाबदारी गॅलेक्झि स्टोअर चे राकेश माहेश्वरी यांनी स्वीकारली.
न्यू प्लॉट परिसर विकास मंच आणि छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या सहकार्याने हे अभियान राबविले जाणार आहे.
याप्रसंगी महावीर पतपेढी चे चेअरमन प्रकाशचंद पारेख,डॉ शरद बाविस्कर,उद्योजक दिलीप ललवाणी, पालिकेचे निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी,जैन जागृती सेंटरचे अधिक डॉ संजय शाह,सोमचंद संदानशिव, प्रतीक जैन,नर्मदा लॉन्स चे कैलास पाटील,रघुनाथ पाटील, सौरभ टेंट चे भिकचंद जैन,बिपिन पाटील,अनिल कोठारी, कैलास केदार, गणेश चौधरी,सुनिल भोई,पो लिस कॉन्स्टेबल अनिल मोरे,अजय पोरवाल,महेश राजपुत,प्रतीक कोराणी, प्रितेश जैन,जयसिंग परदेशी, पंकज वाणी,अभिजित जैन, सतीश ठाकूर,ऋषीकेश शेळके,दीपक जोशी,भाऊसाहेब शिसोदे,योगेश पवार आणि जनता बँक शाखेचे सभासद व ग्राहक आणि कर्मचारी तसेच अमळनेर नगरपरिषद कर्मचारी व परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.




