
व्हा. चेअरमनपदी अशोक चौधरी यांची बिनविरोध निवड
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे दि. 10 आँगस्ट रोजी वि.का. सह. सोसायटीच्या चेअरमनपदी सुनिल देवनाथ पाटील,तर व्हा.चेअरमनपदी अशोक हिलाल चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल महाजन यांनी काम पाहिले तर सचिव सुधाकर पाटील यांनी सहकार्य केले. ठरल्याप्रमाणे चेअरमन रमेश चौधरी व व्हा. चेअरमन श्रीमती मंगलाबाई बडगुजर यांनी राजीनामा दिलेला होता. यावेळी संचालक दिपचंद छाजेड, पिंटू राजपूत, रमेश चौधरी, बाबुलाल पाटील, नरेंद्र सिंग पाटील, जयदीप पाटील, जग्गनाथ चौधरी, काशिनाथ भिल, शोभाबाई महाजन, श्रीमती मंगलाबाई बडगुजर उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार किरणसिंग राजपूत, भिकेसिंग राजपूत, नंदू अण्णा अंबालाल पाटील, किसनसिंग पाटील, रणजितसिंह राजपूत, प्रविण राजपूत, मोतीलाल छाजेड, गुलाब सिंग पाटील भरत राजपूत , दिलिप पाटील,सतिश राजपूत भैय्या महाजन, जितेंद्र पाटील,दिनेश पाटील, गोकूळ पाटील, संदीप पाटील, यांच्या सह आदिंनी सत्कार केला.




