अमळनेर:- घर नावावर करून देत नाही म्हणून एका वृद्धाला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब जखमी वृद्धाने धुळे पोलिसांना दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला ९ जंणाविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ख्वाजा हसन अब्दुल गनी वय ७२ रा बाहेरपूरा मोहल्ला यांनी धुळे येथे दवाखान्यात उपचार घेताना पोलिसांना जबाब दिला की, मी १२ ऑगस्ट रोजी माझ्या घराबाहेर ओट्यावर एकटा बसला असताना २५/५० अ व २५/५१/ अ क हे घरे आमच्या नावावर कर असे सांगून गुलाम अब्दुल रहेमान तेली , रफिक अब्दुल रहेमान तेली ,रहीम रमजान तेली , कांती रमजान तेली ,जिशान कमाल तेली , असीम कमाल तेली , बाबु रमजान तेली , सादिक बाबू तेली , आसिफ बाबू तेली रा गांधीनगर हे एकत्र आले आणि माझ्या अंगावर पेट्रोल टाकले आणि कांती रमजान तेली याने आगगाडी टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सून सुमय्या हिने वाचवण्याचा प्रयत्न केला. नंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तेथून पुढील उपचारासाठी धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी धुळे पोलिसांनी जबाब घेतला. त्या जबाबावरून अमळनेर पोलीस स्टेशनला नऊ आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.