आयएमए व निमा संघटना सहभागी
अमळनेर-इंडियन मेडिकल असोसिएशन आणि निमा संघटना अमळनेरच्या वतीने सर्व वैद्यकीय सेवा बंदचे आवाहन आज दि 17 रोजी करण्यात आले आहे.
आर.जी.मेडिकल कॉलेजमध्ये ड्युटीवर असलेल्या लेडी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या घटनेतील पीडित महिला डॉक्टरच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात हा राष्ट्रव्यापी बंद पुकारण्यात आला असून आज 17 रोजी सकाळी 6 ते 18 रोजी सकाळी 6 पर्यंत सर्व दवाखाने,हॉस्पिटल येथे सर्व सुविधा बंद राहणार आहे.
बंद काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे तरी रुग्णांनी सहकार्य करावे असे आवाहन निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ विशाल बडगुजर, उपाध्यक्ष डॉ महेश पाटील, सेक्रेटरी डॉ चेतन पाटील,खजिनदार डॉ तुषार परदेशी तसेच आय एम ए अमळनेरचें अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, सेक्रेटरी डॉ संदीप जोशी,जॉईंट सेक्रेटरी डॉ प्रशांत शिंदे यांनी केले आहे.