
अमळनेर:- शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. अपर्णा मुंठे यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम करण्यात आला. ध्वजाला मानवंदना देऊन विद्यार्थ्यांनी ध्वजगीत गायले. कार्यक्रमांमध्ये अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्यात बजरंग अग्रवाल तसेच डॉ. अनिल शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांना अमूल्य शब्दात मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण सोहळ्यानंतर विविध देशभक्तीपर गीत व नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांचा उत्साह स्वातंत्र्यदिनी पाहण्याजोगा होता. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गायन करून करण्यात आला.




