अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी मारवड पोलिसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील १६ वर्ष २ महिने वय असलेली अल्पवयीन मुलीस दि. १५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मेडिकलवर औषध घेण्यास कुटुंबीयांनी पाठवले होते. मात्र त्यानंतर ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र कोणताही तपास लागला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी मारवड पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि मंगला पवार ह्या करीत आहेत.