
अमळनेर:- वाडी चौकातील त्रिमूर्ती गणेश मंडळाच्या गेल्या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे व्हिडीओ एडिट करून त्यात दुसऱ्या समाजाचे व्हिडीओ मिसळून इंस्टाग्रामवर टाकल्याने अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजरंग दल नावाच्या सोशल मीडिया ग्रुपवर सदस्य असलेले दीपक रघुनाथ महाजन यांना वादग्रस्त विधान असलेले व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवर प्रसिद्ध झाल्याची माहिती मिळाली. यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या ,भूषण देविदास माळी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.




