अमळनेर : तालुक्यातील मठगव्हाण आणि मुंगसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मयुरी व सुमित भामरे यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
दिव्येश रणछोड पारेख यांच्या स्मरणार्थ भामरे परिवाराने वह्या ,पेन आणि सचित्र बालमित्र पुस्तकांचे वाटप केले. यावेळी छाया इसे , सुनीता लोहारे ,विजय बिऱ्हाडे , प्रेमराज पवार , जगदीश चौधरी , अशोक इसे हजर होते. त्याच प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन देण्यात आले.