
अमळनेर:- जगाला वस्त्र निर्मिती करणारे व साळी समाजाचे आद्य पुरुष वेदमूर्ती श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव श्रावण शु त्रयोदशी १७ ऑगस्ट शनिवार रोजी सालाबादाप्रमाणे साळी समाजा मार्फतविविध कार्यक्रम आयोजित करून सकाळी 6 वाजता जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा व अभिषेक व सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. महिला मंडळ आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता जिव्हेश्वर मंदिर साळी वाडा झामी चौक येथून श्री भगवान जिव्हेश्वर याची मूर्ती पालखीत विराजमान करून टाळ मृदुंग व बँड पथकासहित जय घोषात भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल.
श्री भगवान जिव्हेश्वर महाराज याच्या विषयीची माहिती फार रंजक आहे. प्राचीन काळात मानव निर्वस्त्र व लज्जा झाकण्यासाठी पाला पाचोळा लावून वावरत असे. एके दिवशी आदी शक्ती पार्वती मातेने श्री भगवान शंकरजीना साकडे घातले त्यानुसार मानव जातीला लज्जा झाकण्यासाठी वस्त्र निर्मिती साठी जिव्हे तुन श्री भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्म झाला व पार्वती मातेच्या सांगण्यावरून भगवान शंकराने मानवसृष्टीला लज्जा झाकण्यासाठी साळी कुळात जन्म दिला. व वस्त्र निर्मिती करण्याचे काम भगवान जिव्हेश्वर यांनी केले. भगवान जिव्हेश्वर हे आदी माया पार्वती व भगवान शंकर याचे पुत्र म्हणून पृथ्वी तलावर प्रगटले.
सर्व समाज बांधवानी व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन व विनंती प्रताप छबुलाल साळी व दिलीप प्रभाकर मुंदनाकर यांनी केली आहे




