
अमळनेर:- येथील कनिष्का फाउंडेशन संचालित सी .आर .पाटील .इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक 15 रोजी 78 स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन महेश पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मेजर दिलीप पाटील (सीआरपीएफ) यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सीमा बडगुजर, प्रतिष्ठा देवरे यांनी आयोजन केले होते. तसेच अनेक मुलांनी देशभक्ती गीतांचे सादरीकरण केले. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एक विद्यार्थी एक झाड असे घोषणा वाक्य देत सर्व विद्यार्थ्यांना एक एक झाडांचे रोपटे घेऊन निसर्ग संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करून मुलांना नैसर्गिक साधन संपत्तीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पंकज पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अनिता पाटील यांनी केले.

