
अमळनेर:- घरासमोर खेळणाऱ्या मुकबधीर अल्पवयीन मुलीला आडोश्याला नेऊन तिच्यावर नातेवाईकाने अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील जवखेडा येथे १४ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
मुलीच्या आईने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.

