
अमळनेर:- बैलाने मारल्याने बरगळ्याना मार लागून ६५ वर्षाच्या पातोंडा येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी रात्री साडे दहा वाजता पातोंडा येथे घडली.
वसंत विनायक पवार यांना १५ ऑगस्ट रोजी बैलाने मारल्याने ते खाली पडून त्यांच्या डाव्या बरगळीला मार लागला होता. २२ रोजी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने सुरुवातीला पातोंडा येथे डॉक्टरांना दाखवण्यात आले. त्यांनतर नर्मदा मेडिकल फौंडेशन मध्ये आणण्यात आले. तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा पुतण्या योगेंद्र रवींद्र पवार याने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.




