
अमळनेर: अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृतीसमारोह राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कल्याण च्या यश पाटील ने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तरुणाईच्या विवेकी आवाजाला प्रोत्साहन देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये द्वितीय पारितोषिक ९ हजार रुपये तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक दोन हजार रुपये असे ठेवण्यात आले होते. स्पर्धेसाठी ‛आंदोलने शेतकऱ्यांची, परीक्षा सरकारची’, समाजवाद- आज,काल उद्या, ‛बोल की लब आजाद है तेरे!’ , ‛भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य’, ‛खरा तो एकची धर्म’ या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. प्रथम क्रमांक यश पाटील (कल्याण) , द्वितीय कोमल शेलार (मालेगाव) तृतीय वरून घरटे (पुणे), उत्तेजनार्थ समृद्धी मोराणकर व प्रशांत बेले (मालेगाव) या विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकावले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे प्रा अशोक पवार तर नियमांचे वाचन प्रा लीलाधर पाटील यांनी केले सूत्रसंचालन जे एस पाटील , डी. ए. धनगर व शारदा उंबरकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी मानले. परीक्षक म्हणून डॉ सत्यजित साळवे , डॉ शमा सराफ ,प्रा नितीन पाटील यांनी काम पाहिले. संयोजन समितीचे सारांश सोनार व कौस्तुभ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे, संचालक गुणवंत पाटील, एड. अशोक बाविस्कर, अमृत पाटील, भास्कर बोरसे, डॉ ए जे शेख, किरण पाटील, मगन पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, माजी मुख्याध्यापक एस डी देशमुख, सर्व पत्रकार, विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

