
अमळनेर:- खुन्नस देऊन बघण्याच्या कारणावरून दोघांवर आठ ते दहा जणांनी मंगरूळ येथे हल्ला केल्याची घटना २८ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.
जिनगर गल्ली मधील कामील हुसेन खाटीक व कलीम यासीन खाटीक हे मंगरूळ येथे खाटीकचा व्यवसाय करतात. २८ रोजी एकमेकांकडे बघण्यावरून आठ ते दहा जणांनी त्यांच्यावर मंगरूळ येथे हल्ला केला. त्यात कामील याला पोटाला ओरखडा, हाताला व डोक्याला मार लागला आहे. तर कलीम याला मुक्का मार लागला आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे,अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, सागर साळुंखे, संदेश महाजन, होमगार्ड पूनम हटकर याना घटनास्थळी पाठवले. मारणारे पळून गेले होते. पोलीस गाडीतच जखमींना आधी ग्रामीण रुग्णालयात नंतर खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन धुळ्याला रवाना करण्यात आले. जखमीच्या पोटाला चाकू लागल्याचा संशय आहे. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.




