मुंबईत पार पडला पदवीप्रदान सोहळा,
अमळनेर-येथील सुपुत्र आदित्य राजेश अग्रवाल याने अमळनेरात मुंबई येथील पवई आयआयटीचा पहिला अमळनेरकर आयआयटियन होण्याचा बहुमान प्राप्त केला असून 24 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडलेल्या पदवीप्रदान सोहळ्यात त्याला आयआयटियनची पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.जेईई ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा तर आयआयटी ही सर्वाधिक बहुमानाची पदवी ही समजली जाते.
घरची परिस्थिती सदन व वडिलांचा व्यवसायही उत्तम असताना मुलालाही शिक्षणाची आवड असल्याने वडिलांनी प्रोत्साहन दिले आणि त्यानेही जिद्द ठेवून मोठी शैक्षणिक प्रगती साधली आहे.आदित्य हा अमळनेर येथील बालाजी स्टील चे संचालक राजेश अग्रवाल यांचा मोठा सुपुत्र आहे. त्याचे दहावी पर्यंत शिक्षण मुंदडा ग्लोबल स्कुल,अमळनेर येथे झाले असून त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो राजस्थान कोटा येथे गेला होता, आधीपासूनच जेईई कडे कल असल्याने तेथेच 11वी सायन्सला प्रवेश घेऊन जेईई साठी खाजगी कोचिंग संस्थेत प्रवेश मिळविला,अंगी गुणवत्ता असल्याने अवघ्या सहाच महिन्यात स्टार बॅच मध्ये त्याचा समावेश झाला,अखेर प्रचंड जिद्दी च्या बळावर त्याला जेईई मेन्स मध्ये 99.99 टक्के मिळून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा बहुमान त्याने मिळविला.भारतात एकूण फक्त 9 ठिकाणी आयआयटी इन्स्टिट्यूट असुन यात महाराष्ट्र राज्यातील मुंबई पवई येथील आयआयटी सेंटर सर्वात टॉप ला आहे.संपूर्ण भारतात उच्च गुणवत्ता असलेल्या टॉपर 50 मुलांना याठिकाणी प्रवेश मिळतो,आदित्य यात पात्र ठरल्याने मॅकेनिकल पदवी साठी त्याला प्रवेश मिळाला. प्रवेशानंतर खऱ्या अर्थाने आदित्य ची कसोटी सुरू झाली,कारण अतिशय कठोर परिश्रम चार वर्षे घ्यावे लागतात, मात्र जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर आदित्य ने चारही वर्ष अखंडितपणे पूर्ण करून आयआयटी तो उत्तीर्ण झाला. नुकत्याच झालेल्या पदवीप्रदान सोहळ्यात एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राम चंदानी आणि गोदरेज चे सौरभ झंवर यांच्या हस्ते त्याला पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याच्या आईवडीलानीही उपस्थिती देऊन या सोहळ्याचे ते साक्षीदार झालेत.अमळनेरात 15 वर्षापूर्वी कानपूर येथून एक जण आयआयटी झाले असून त्यांच्यानंतर कुणीही ही पदवी मिळवू शकलेले नाहीत.मात्र मुंबईत आयआयटी तुन पदवी मिळविणारा आदित्य हा पहिलाच विद्यार्थी असल्याने अमळनेर येथून सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नुकतीच त्याला एअर इंडिया दिल्ली येथे प्लेसमेंट मिळाली आहे.
सुरवातीला कमी मार्क्स मिळाले म्हणून नाराज होऊ नका
यासंदर्भात आदित्यचे वडील राजेश अग्रवाल यांनी अमळनेर परिसरातील मुलं आणि पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोचिंग साठी कोट्याला मुलांना पाठविण्यासाठी सुरवातीला पालक घाबरत होते मात्र मुलाच्या प्रगतीसाठी मी हिम्मत केली, त्यानेही त्याचे सोने केले, खरे पाहता सुरवातीला मुलांना कमी मार्क्स मिळाले म्हणून आपल्या कडील पालक मुलांवर नाराज होऊन त्यांचे मॉरल डाऊन करतात मात्र मी तसे न करता उलट मुलाला प्रोत्साहन देत गेलो त्यामुळे अवघ्या सहाच महिन्यात स्टार बॅच चा विद्यार्थी तो झाला.आणि तेथून उत्साहित झाल्याने आज तो चक्क आयआयटीयन्स झाल्याने मोठा आनंद आम्हाला झाला आहे.आता अनेक विद्यार्थी कोटा किंवा इतर ठिकाणी कोचिंग साठी जाऊ लागल्याने भविष्यात अनेक मुलं आयआयटीयन्स व नीट परीक्षेतून डॉक्टर होऊ शकतील.