महिलेचा विनयभंग व तिच्या पतीला मारहाण केल्याची तक्रार…
अमळनेर:- विहिरीत मोटार टाकण्याच्या कारणावरून सख्या भावाच्या कुटुंबांमध्ये भांडण होऊन महिलेचा विनयभंग व तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील निसर्डी येथे २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घडली.
फिर्यादी महिलेचा पती ,सासू व मुलगा शेतातील विहिरीत मोटर टाकत असताना तिचा दिर व दिरानी हातात काठी घेऊन शिवीगाळ करत पतीला मारहाण करू लागले. महिला आवरायला गेली असता तिच्या दिराने तिचा विनयभंग केला. तिचे केस ओढून तिलाही मारहाण केली आणि अश्लील शिवीगाळ केली. महिलेच्या फिर्यादीवरून दिर आणि देरानी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.