श्रावण मास निमित्ताने तीन दिवस कार्यक्रम
अमळनेर– खान्देश तीर्थ श्री कपिलेश्वर मंदिर तापी पांझरा गुप्त कपिल गंगा (मुडावद-निंब) येथील त्रिवेणी संगमावर प. पू.. महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांच्या उपस्थीतीत श्रावण मास निमित्ताने त्रिदिवशीय पार्थिव शिवलिंग पूजन कार्यक्रमाचे आयोजन दि 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
दिनांक 30 शुक्रवार रोजी गोवत्स पूजन,दिनांक 31 शनिवार रोजी शनि प्रदोष आणि दिनांक 1 सप्टेंबर रविवार रोजी महाशिवरात्री (समाप्ती) होणार असून उपरोक्त तीन दिवस भव्य प्रमाणात शास्त्रोक्त रित्या पार्थिव शिवलिंग पूजन होणार आहे.तरी इच्छुक भाविकांनी स्वतचे पूजन साहित्य घेवून कपिलेश्वर मंदिरावर सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे. सकाळी 8 ते 9 पार्थिव शिवलिंग निर्माण, सकाळी 9 ते 12 पूजन आणि दु.12 वाजे नंतर भोजन व्यवस्था मंदिरावरच राहिल.
तसेच अन्नदानासाठी ज्या भाविकांना मदत करावयाची असल्यास त्यांनी मंदिरावर पोहच करावी आणि सर्वानी पार्थिव शिवलिंग पूजनाचा लाभ मिळवून पूण्यफल प्राप्त करावे अशी विनंती वजा आवाहन महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज भक्त मंडळ श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9421704934 व 7498990773 यावर संपर्क साधावा.