
अमळनेर:- कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत झालेल्या माकडावर २८ रोजी अंत्यसंस्कार व १ रोजी उत्तरकार्य कार्यक्रम हिंदू पद्धतीनुसार केले.
माकडाला हनुमानचे म्हणून प्रतीक मानले जाते. २८ रोजी लोणचारम गावात कुत्र्यांनी केलेल्या सामूहिक हल्ल्यात माकड गंभीर जखमी झाले होते. यामुळे वेदनासन्न झालेल्या माकडाचा मृत्यू २८ रोजी माजी सरपंच विवेक पाटील यांच्या खळ्यात झाला. ही बाब ग्रामस्थांना निदर्शनास आली. त्यामुळे ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार केला. सर्व गाव एकत्र आले आणि त्यांनी माकडाचा अंत्यविधी गावात मिरवणूक काढून मोठ्या भक्तीभावाने केला. संजय थोरात या तरुणाने माकडाला अग्निगडाग दिला. त्यानंतर सुतक पाळत पाच दिवसांनी म्हणजे दि.१ रविवारी सामूहिक वर्गणी जमा करत उत्तरकार्य हिंदू पद्धतीने केले. यावेळी सर्व समाजाच्या गावकऱ्यांनी केशवपन केले. त्यानंतर गंधमुक्ती कार्यक्रम केला. त्यानंतर उत्तरकार्य भोजन देखील सर्व गावाने करून माकडाला श्रद्धेने श्रद्धांजली अर्पण केली.




