अमळनेर:- तालुक्यातील जानवे, लोंढवे येथील घरासमोरून व खळ्यातून महागडी गुरे रात्रीतून चोरीस गेल्याचे प्रकार घडला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भास्कर पाटील याची एक गावरान गाय, चेतन शिवदास पाटील यांची एक गावरान जातीची पांढ-या रंगाची गाय व जर्शी जातीचे पांढ-या रंगाच्या वासऱ्या व एक जर्शी जातीची लाल रंगाची गाय अशी २९ हजार रुपयांची गुरे चोरीस गेले आहेत. गावातील जगन नवल पाटील यांचे तसेच महारू तेजपान पाटील रा. जानवे ता. अमळनेर यांच्या मालकीचे वरील गुरे हे दि. ३१ रोजी रात्री ९ ते दि.१ रोजी सकाळी ५ वाजेचे दरम्यान गोठ्यातून व घरासमोरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्यावरून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस हवालदार कैलास शिंदे हे करत आहेत.