मांडळ ते अंबापिंप्री रस्त्याचा मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ…
अमळनेर:- मतदारसंघातील अंबापिंप्री येथे विविध विकास कामांचे थाटात लोकार्पण व भूमिपूजन मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने 2 कोटी निधीतून मांडळ ते आंबापिंप्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे व त्यावरील पुल निर्माण कामाचे भूमिपूजन बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी तलाठी कार्यालय बांधणे (२५ लाख), 90.10 अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे (२० लाख), दलित वस्तीमधील रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख) आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच दलित वस्तीतीतील सभामंडप बांधणे (१८ लाख), जिल्हा परिषद अंतर्गत बांधण्यात आलेली स्मशानभूमी(१० लाख) व ३ कोटी रुपयांच्या बंधाऱ्यांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी ही सर्व कामे मंजूर झाली असून मंत्री पाटील यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले, याप्रसंगी गोविंदराव नगराज पाटील, अजय बाविस्कर,चतुर भाऊसाहेब, भिलाली गावचे सरपंच बाळु पाटील, निंबा पाटील भिलाली, सतीश पाटील संचालक पारोळा, राजाराम पाटील कंकराज, सरपंच शशीभाऊ, कोळपिंप्रीचे उपसरपंच जितेंद्र पाटील, फापोरे गावचे मा. सरपंच नंदलाल पाटील, दगडी सबगव्हाण मा. सरपंच, अंकुश भागवत, रत्नापिंप्री मा. उपसरपंच सुनील पाटील, पोलीस पाटील नितीन पाटील, ग्रा.पं. सदस्य कंकराज, दीपक नामदेव पाटील मा. उपसरपंच भिलाली योगेश पाटील कन्हेरे, उपसरपंच सुनील पाटील, कोळपिंप्री मा. उपसरपंच संभाजी पाटील, वडगाव मा. उपसरपंच चंद्रकांत पाटील, मा. उपसभापती सुनील वाणी उपस्थित होते.मंत्री पाटील यांनी गावाच्या व परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू शकणार नाही अशी ग्वाही सर्वाना दिली.