अमळनेर:- तालुक्यातील बोरगाव येथील युवा उद्योजक, व सामाजिक कार्यकर्ते इं.परेश यशवंतराव शिंदे यांनी नूकताच खा. शरदचंद्र पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेतली असून त्यांना राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्षा डॉ. बी. एस. पाटील, सरचिटणीस तिलोत्तमा रविंद्र पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील,प्रा. अशोक पवार, श्याम पाटील, रीता बाविस्कर,अनंत निकम, श्यामकांत पाटील,डॉ. प्रशांत शिंदे, प्रविण देशमुख, शुभम सोनवणे,दिनेश पाटील,नरेंद्र पाटील,दिनेश साळुंखे, योगेश पाटील,सागर पाटील, मयूर पाटील, यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.