
अमळनेर:- टॅक्सीचालकाचा मुलगा नीट’ पी.जी. परीक्षेमध्ये भारतात १६५१ रँक मध्ये उत्तीर्ण झाल्याने ढेकूपरिसरातील परिसरातील नागरिकांनी त्याचा गौरव केला. येथील गायत्री नगर भागातील उदय संजय पाटील याने ‘नीट’ पीजी परीक्षेत ८०० पैकी ६२१ गुण मिळवले.
तो टॅक्सी चालक संजय भाऊराव पाटील यांचा मुलगा आहे. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असतांना त्याने खुप मेहनत करून यश संपादन केले. त्याचे शिक्षण काका निवृत्त ग्रामसेवक विठ्ठल भाऊराव पाटील यांनी देखील त्याला शिक्षणासाठी सहकार्य केले आहे.
सध्या तो एमबीबीएसला केईएम रुग्णालयात शिक्षण घेऊन त्याने नीट पी जी परीक्षा दिली. त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असून तो यानंतर एमडी मेडिसीनचे शिक्षण घेणार आहे.
यानिमित्ताने ढेकूरोड परिसर मित्रमंडळाने त्याचा गौरव केला. यावेळी माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, बी.एम.पाटील, गोकुळ पाटील, दिलीप पाटील, विजय पवार, सुभाष सोनवणे, चंद्रकांत पाटील, निलेश पाटील, विठ्ठल पाटील, चंद्रकांत पाटील, आदींनी त्याचा गौरव केला.
त्याला त्याची काकू सुनीता व आई ललिता आदींनी त्याला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. या त्याच्या वैद्यकीय शिक्षणासाठी त्याला प्रेरणास्थान निवृत्त ग्रामसेवक विठ्ठल पाटील व काकू सुनीताबाई हे आहेत.




