मंत्री अनिल पाटील,खा.स्मिता वाघ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ समाजबांधवांचा सत्कार
अमळनेर-शहरात प्रथमच कुणबी पाटील समाजाचा समाज मेळावा दि 8 सप्टेंबर रोजी ठगुबाई रिसॉर्ट,अमळनेर येथे पार पडला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील,जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा.स्मिता वाघ व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कुणबी पाटील समाज मंडळ,अमळनेर यांनी हा मेळावा आयोजित केला होता, यावेळी विद्यार्थी गुणगौरव व जेष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंत्री अनिल पाटील,प्रमुख अतिथी म्हणून खा स्मिता वाघ, उद्योजक सरजू गोकलाणी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मालेगाव येथील सुभाष पाटील, पीएसआय जे बी पाटील, धुळे येथील सौ माधुरी पाटील, पालघर येथील डॉ योगेश अहिरे, प्रमुख पाहुणे म्हणून अर्बन बँक मॅनेजर अमृत पाटील,ऍड एस आर पाटील,निलेश पाटील, उद्योजक अशोक पाटील, जळगाव धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे किशोर पाटील,डॉ रमेश अहिरराव, डॉ विनोद पाटील,प्रकाश पाटील, आनंदराव पाटील,रामानंद पाटील, रवींद्र पितांबर पाटील व रविंद्र गोरख पाटील यांची उपस्थिती लाभली .यावेळी 2023-24 या शैक्षणिक वर्षात 10 वी आणि 12 वी मध्ये उल्लेखनीय यश मिळविणारे विद्यार्थी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या समाजातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, आयोजनासाठी कुणबी पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष शेखर लोटन पाटील,उपाध्यक्ष नवल किसन पाटील,सचिव अशोक मुरलीधर पाटील,खजिनदार पुरुषोत्तम एकनाथ पाटील,सहसेक्रेटरी शिवाजी बापू पाटील व समस्त कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.