अमळनेर:- शहरातील जायन्ट्स ग्रुप ऑफ वीरांगना सहेलीतर्फे 8 सप्टेंबर 2024 रोजी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातअंतर्गत वर्णेश्वर वस्तीतील गरजू लोकांना मदत म्हणून साड्या,लहान मुलांना, तरुण -तरुनींचे तसेच पुरुषांचे असे कपडे वाटप केले.
यावेळी विरांगना सहेलीच्या अध्यक्ष सौ.दिपीका सोनवणे, सचिव सौ.शोभा पाटील व संचालिका सौ.सुदर्शना पाटील उपस्थित होत्या.एक हात मदतीचा याच उपक्रमाअंतर्गत मागील वेळी शासकीय आयटीआय कॉलेजजवळील वस्तीत जवळपास 800 कपडे वाटप करून झालेला होता आणि विरांगना सहेलीच्या वतीने हाच उपक्रम नेहमी सुरु राहील तरी इच्छुकांनी या उपक्रमासाठी पुढे येऊन मदत करावी अशी विनंती अध्यक्षा दिपीका सोनवणे यांनी केली.