अमळनेर: येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पर्यावरण संवर्धन सोबतच मातांच्या सन्मानार्थ झाडे लावणे ह्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे उदघाटन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य आणि खानदेश शिक्षण मंडळ सचिव डॉ.अरुण बी. जैन व डॉ.धीरज वैष्णव, सह सचिव व आधिसभा सदस्य यांच्या हस्ते संपन्न झाले. मातांच्या नावाने झाडे लावण्याचे भावनिक महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना झाडांची देखभाल करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमाला विशिष्ट मान्यवरांची उपस्थिती होती, ज्यामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,जेष्ठ बजरंग अग्रवाल, योगेश मुंदडे, डॉ.अनिल शिंदे, हरी भिका वाणी आणि सी ए निरज अग्रवाल,प्रकाश मुंदडे, सौ.माधुरी पाटील,विनोद अग्रवाल यांचा समावेश होता,त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमास विशेष मान मिळाला.
कार्यक्रमाचे आयोजन एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ.हेमंत जी. पवार आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. वृक्षारोपण दरम्यान, महाविद्यालयाच्या प्रांगणात *सायप्रस, फॉक्सटेल पाम, अरेका पाम यांसारख्या झाडांची लागवड* करण्यात आली. प्रत्येक झाड आईच्या नावाने समर्पित केले गेले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एका प्रकारे भावनिक जागरूकता निर्माण झाली.
एन एस एस स्वयंसेवकांनी या झाडांची काळजी घेण्याचे वचन दिले. “एक पेड माँ के नाम” उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.या प्रसंगी रवी पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यामुळे महाविद्यालयाच्या प्रांगणात फुललेली झाडे पर्यावरण समृद्ध करतील आणि भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यास एन एस एस विभाग तत्पर राहील,अशी अपेक्षा यामुळे व्यक्त करण्यात येत आहे.