
अमळनेर:- तालुक्यातील धार गावी गणेशोत्सव निमित्त दिनांक 10 ते दिनांक 16 पर्यत शिवमहा पुराण सप्ताहचे आयोजन अष्टविनायक गणपती मंडळाने केले आहे
शिव महापुराण कथेसाठी मंदिर संस्थानकडून व्यवस्था अस्टविनायक गणेश मंदिर प्रांगणात मंडप उभारून भाविकांसाठी कथा मंडप उभारण्यात आला आहे, शिव महापुराण कथेसाठी वृंदावन धाम येथील कृष्णकृपा व्यास प्रेम मूर्ती हभप दिलीपजी महाराज यांच्या कडून निरूपण केले जाणार असून कथेची वेळ ही रात्री 8 ते 11 ठेवण्यात आली असून त्यांना गायन साथ संगत म्हणून हभप ज्ञानेश्वर महाराज बोदवदकर देणार आहेत तर धुपेकर संस्थानचे हभप रामेश्वर महाराज तबला साथ देतील व प्रतिकात्मक वेशभूषा हभप आबा महाराज नेरकर हे भूषविणार आहेत, कार्यक्रम यशस्वीतेसाठी धार ग्रामस्थ भजन मंडळ, गणेश मंडळ, भवानी माता ग्रुप सहकार्य करीत आहे, तरी तालुक्यातील भाविकांनी गणेशोत्सव काळातील शिवमहा पुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन अस्टविनायक गणेश मंडळ व धार ग्रामस्थांनी केले आहे




