अमळनेर: शहरातील रेल्वे स्थानकावर दि. ८ रोजी दुपारी ३:४० वाजेच्या सुमारास सुरतच्या दिशेने जाणारी गांधी धाम एक्सप्रेस अमळनेर प्लॅटफॉर्म क्र. १ वर येत असताना सुरत ला जाण्यासाठी निघालेल प्रवाशी विकास अभिमन्यू पाटील (राहणार – झाडी) हे जागा मिळवण्यासाठी धावपळ करत प्लॅटफॉर्म वरून गाडीत चढत असताना अचानक तोल गेल्याने ते गाडीच्या चाकाखाली आले. चाकाखाली आल्याने त्यांच्या दोन्ही पाय पंजाच्या चेंदामेंदा झाला प्लॅटफॉर्मवर उभे असलेले पत्रकार रजनीकांत पाटील यांनी त्याचं वेळी त्यांना धावपळ करत बाहेर काढले व कर्मचाऱ्यांच्या मदतीने उचलून त्यांना फलटावर ठेवले. तातडीने आरपीएफ यांना संपर्क साधला असता घटनास्थळी पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचारी यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले तसेच तेथून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास लोहमार्ग पो.ना दिनकर कोळी करीत आहे.
Related Stories
December 22, 2024