
अमळनेर:- ग्रामीण भागाच्या आणि सरपंच बांधवाच्या मागण्या मान्य करा यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांचे मार्गर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुषमा देसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन साकडे घालण्यात आले.
यावेळी राजमल भागवत, जिल्हाध्यक्ष बालूभाऊ धूमाल, कल्याणी पाटील ,शितल पाटील, वर्षा पाटील, जोत्सना लोहार, श्रद्धा पाटील, शितल जोगी,स्वरा पाटील, नबाब तडवी,गणेश महाजन,श्रीकांत पाटील, युवराज पाटील, निर्दोष पवार, गणेश पाटील, अतुल चौधरी असे दोनशे पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मधील निवासस्थानी धडक मारली. मंत्री महाजन यानी सर्व पदाधिकारी यांना पूरेसा वेळ देवून त्यांचे सविस्तर ऐकून सकारात्मक प्रतिसाद देवून तात्काळ मागण्या मार्गी लावतो असे आश्वासन दिले. व परिषदेला आंदोलन करण्याची गरज भासू देणार नाही असे सांगितले, सरपंच परिषदचे पदाधिकारी यांनी मंत्री महाजन यांचे आभार मानले.




