
राहत्या घरी घेतला गळफास, तालुक्यातील पिळोदे येथील घटना…
अमळनेर:- तालुक्यातील पिळोदे येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने बाजाराला सोबत नेले नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १२ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिळोदे येथील मालुबाई सुधाकर कोळी ह्या बाजार करण्यासाठी अमळनेर जाणार होत्या, त्यावेळी त्यांची मुलगी माया सुधाकर कोळी (वय १४) ही सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. मात्र मालुबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. मालूबाई ह्या बाजार करून आल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने तिला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत




