
अमळनेर:- शहरातील विठ्ठल नगर भागात अवघड भागातील विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण अग्निशामक दलाने वाचवले आहेत.
१२ रोजी विठ्ठल नगर येथील जुन्या विहिरीत कुत्रा पडल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाठवले. अवघड जागेत जावून विहिरीतून कुत्र्याला बाहेर काढले. कुत्र्याचे प्राण वाचवल्याबद्दल अग्निशमन दलाचे जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, वसीम पठाण, भिका संदानशिव यांचे नागरिकांनी कौतुक केले.




